भुसावळ-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
येथील तालुका पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्याला सहा हजार रूपयांची लाच स्वीकारतांना आज दि.२२ जून रोजी सकाळी एसीबीच्या पथकाने अटक केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,गणेश पोपटराव गव्हाणे रा.जामनेर हे तालुका पोलीस स्थानकात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत त्यांनी एका प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी तडजोड म्हणून सहा हजार रूपयांची मागणी केली होती यामुळे सदर व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती.या तक्रारीनुसार एसीबीचे उपअधिक्षक शशिकांत पाटील यांनी पोलीस निरिक्षक संजोग बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली पथकाची निर्मिती केली व या पथकाने आज सापळा रचला.आज भुसावळ तालुक्यातील मांडवेदिगर गावाजवळ गणेश गव्हाणे यांना सहा हजार रूपये स्वीकारतांना या पथकाने अटक केली आहे.सदरील कारवाईमुळे जिल्ह्यातील लाचखोर अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.