Just another WordPress site

“माझ्या मुलीची हत्या केली तशीच मला त्याची हत्या करायची आहे” दर्शनाच्या आईची संतप्त प्रतिक्रिया

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दर्शना पवार हत्या प्रकरणात पोलिसांनी राहुल हंडोरेला अटक केली असून दर्शनाची हत्या राहुल हंडोरेनेच केल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.राजगडाच्या पायथ्याशी दर्शना पवारचा मृतदेह आढळला होता त्यानंतर तिचा मित्र राहुल हंडोरे गायब झाला होता त्याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे.राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवारच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.हत्येनंतर फरार झालेला मुख्य आरोपी राहुल हंडोरेला अटक केल्यानंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाबाबत माहिती दिली आहे.यात त्यांनी राहुल हंडोरेने दर्शना पवारची हत्या का केली याचे कारणही सांगितले आहे.सदरील माहिती पुणे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी आज २२ जून गुरुवार रोजी  पुण्यात पत्रकार परिषदेत दिली आहे.पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी म्हटले आहे की,आम्हाला सखोल तपास करण्यासाठी वेळ मिळालेला नाही मात्र प्राथमिक तपासात असे  दिसत आहे की दर्शना पवारने राहुल हंडोरेला लग्नासाठी नकार दिला त्यामुळे त्याने दर्शनाचा खून केला.दोघांचीही खूप जुनी ओळख असून आरोपी राहुलला दर्शनाबरोबर लग्न करायचे होते दर्शनाने या लग्नाला नकार दिला म्हणून राहुलने खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून त्यानंतर दर्शना पवारच्या आईची आणि भावाची संतप्त प्रतिक्रिया समोर आली आहे.

याबाबत दर्शना पवारच्या आईने म्हटले आहे की,मला मुंबईला घेऊन जा व माझ्या दर्शनाचे जसे तुकडे केले तसेच त्या राहुलचे तुकडे मी करते. मी एकटीच तुकडे करेन मला कुणाचीच मदत नको.माझ्या मुलीची हत्या केली तशीच मला त्याची हत्या करायची आहे.मला माझ्या मुलीला न्याय द्यायचा आहे आणि मीच देईन तो न्याय.राहुल हांडोरेला फाशीची शिक्षा झाली पाहिजे.तो जिवंत रहायलाच नको.आणखी १० मुलींचे पुढे नुकसान व्हायला नको.माझी मुलगी गेली तशी इतर कुणाची मुलगी जाऊ नये त्यामुळे राहुल हांडोरेला फाशीच झाली पाहिजे.तर दर्शना पवारच्या भावाने  म्हटले आहे की,राहुल हांडोरेला आमच्या ताब्यात द्या किंवा मारुन टाका त्याला जिवंत सोडता कामा नये त्याच्यामुळे माझ्या बहिणीला त्रास झाला आहे त्याला मारा किंवा आमच्याकडे द्या एवढीच विनंती सरकारला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.