यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील राज्य महामार्गाला लागुन असलेल्या चुंचाळे फाटा ते चुंचाळे गावापर्यंतच्या रस्त्याची ठीकठीकाणी अपघातास आमंत्रण देणारे मोठमोठे खड्डे पडल्याने अत्यंत बिकट अवस्था झाली आहे सदरील रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करून हि समस्या सोडवावी अशी आग्रही मागणी परिसरातील वाहनधारक व गावकऱ्यांनी केली आहे.
बुऱ्हाणपुर अंकलेश्वर या राज्य महामार्गास लागुन असलेल्या चुंचाळे गाव फाटा ते चुंचाळे गावापर्यंतच्या सुमारे चार किलोमिटर रस्त्याची मागील काही वर्षापासुन रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठे खड्डे पडल्याने अत्यंत दयानिय अवस्था झाली असुन वाहनधारकांना वाहन चालवितांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे.परिसरातील अनेक आदीवासी गावांशी जोडणाऱ्या या मार्गावर वाहनधारकांना आपला जिव धोक्यात घालुन आपली वाहने चालवावी लागत आहेत.याबाबत चुंचाळे व बोराळे यासह परिसरातील ग्रामस्थांनी वेळोवेळी परिसरातील लोक प्रतिनिधी,यावल पंचायत समिती व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे या मार्गाची दुरूस्ती व्हावी यासाठी वारंवार पाठपुरावा केला असुन अद्यापपर्यंत या समस्येकडे कुणालाच वेळ नसल्याचे दिसुन येत आहे.दरम्यान या मार्गावर एखाद्या मोठा अपघात होण्यापुर्वीच प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन सदरील रस्त्याचे तात्काळ संपूर्ण डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी चुंचाळे बोराळे व परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.