यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल या शाळेचा विद्यार्थी आदित्य आशिष पाटील याची नवोदय विद्यालयासाठी नुकतीच निवड करणात आली आहे.आदित्य पाटील हा पोद्दार इंटरनॅशनल स्कूल येथे इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत होता त्याने एप्रिल २०२३ मध्ये नवोदयची परीक्षा दिली होती त्यात तो उत्तीर्ण झाला असून त्याची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे.
आदित्य पाटील हा विद्यार्थी यावल येथील राहणारे व भुसावळच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सहाय्यक भंडारपाल म्हणुन सेवेत असलेले आशिष पाटील यांचा मुलगा आहे.त्याला त्याचे आजोबा सेवानिवृत्त प्राचार्य पी.ई.पाटील तसेच भुसावळ येथील शुभांगी पाटील यांचे व त्याची आई मिनल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.आदित्य यांने मिळवलेल्या यशाबद्दल फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग,यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील व माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश मुरलीधर कोलते यांनी तसेच विविध क्षेत्रातील समाज बांधवांनी त्याच्या यशाचे कौतुक करून अभिनंदन केले असून त्यास भावी शैक्षणीक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.