Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
राज्य सरकारने नऊ नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालयांची (आरटीओ) निर्मिती केली असून यासाठी राज्यातील नऊ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांचे रुपांतर आरटीओमध्ये करण्याचा आदेश गृह विभागाच्या वतीने काल दि.२३ जून शुक्रवार रोजी काढण्यात आला आहे.यात पिंपरी-चिंचवड,जळगाव,सोलापूर,अहमदनगर,वसई (जि.पालघर),चंद्रपूर,अकोला,बोरीवली आणि सातारा यांचा समावेश करण्यात आला आहे.
यामुळे काही आरटीओंच्या अंतर्गत असलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्येही बदल करण्यात आला असून पुणे आरटीओमध्ये आता बारामती उपप्रादेशिक कार्यालय असणार आहे.पुण्याच्या अंतर्गत असलेले पिंपरी-चिंचवड आणि सोलापूर हे आता वेगळे आरटीओ असतील. सोलापूर अंतर्गत अकलूज उपप्रादेशिक कार्यालय असेल याचप्रमाणे इतर आरटीओंमधीलही रचना बदलण्यात आली आहे.राज्य सरकारने परिवहन कार्यालयाच्या अखत्यारीतील सुधारित आकृतीबंधासही मान्यता दिलेली आहे यामुळे मागील काही काळापासून परिवहन विभागातील रखडलेल्या पदोन्नतीचा मार्ग खुला झाला आहे त्यामुळे पदोन्नतीसाठी प्रतीक्षेत असलेल्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची आता प्रादेशिक परिवहन अधिकारी होतील.त्यामुळे राज्यात आता पिंपरी-चिंचवड,जळगाव,सोलापूर,अहमदनगर,वसई (जि.पालघर),चंद्रपूर,अकोला, बोरीवली,सातारा या नवीन प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयांचा समावेश करण्यात आला आहे.