Just another WordPress site

पुढील पाच दिवस महाराष्ट्रासह इतर भागात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

गेल्या जवळपास दोन आठवड्यांपासून जणूकाही रुसून बसलेला पाऊस अखेर अवतरला असून पुढचे पाच दिवस महाराष्ट्राच्या बहुतांश भागात तो सक्रीय राहणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे त्यामुळे गेल्या दोन आठवड्यांची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे.याबाबत पुणे वेधशाळेचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.या ट्वीटमध्ये होसाळीकर यांनी मुंबईतील कुलाबा वेधशाळेकडून जारी करण्यात आलेला तक्ताच शेअर केला आहे त्यानुसार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात कधी आणि किती प्रमाणात पाऊस पडेल याविषयीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाच्या प्रतीक्षेत उकाड्याने नागरिक हैराण झाले होते काल  शुक्रवारी रात्रीच महाराष्ट्राच्या काही भागात मान्सूनने हजेरी लावली असून आज सकाळपासून पुणे,मुंबईत पावसाच्या सरी बरसल्या आणि नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली.महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात मान्सून सक्रीय झाला असून येत्या पाच दिवसांत पाऊस मनसोक्त कोसळणार असल्याचा अंदाज वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे.

याबाबत के.एस.होसाळीकरांनी केलेल्या ट्वीटमध्ये महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पुढच्या पाच दिवसांत मान्सून सक्रीय राहण्याचा अंदाज नमूद करण्यात आला आहे यानुसार कोकण व विदर्भात काही दिवस मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात पुणे,सातारा आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातही मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.मराठवाड्यात पावसाचा जोर असेल असेही वेधशाळेकडून सांगण्यात आले आहे.

पुणे वेधशाळेचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी मुंबईतील कुलाबा वेधशाळेकडून जारी करण्यात आलेला तक्ता पुढीलप्रमाणे आहे.

monsoon updates

मुंबईत आज आणि उद्या अर्थात २४ आणि २५ जून रोजी मध्यम तीव्रतेचा तर २६ ते २८ जून या तीन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.ठाणे आणि पालघरमध्येही याच प्रमाणात पुढचे पाच दिवस पाऊस असेल.रायगडमध्ये २५ जून ते २८ जून या कालावधीत मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा अंदाज आहे.रत्नागिरीत २४ ते २६ जून या तीन दिवसांत मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस तर २८ व २८ जून रोजी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.सिंधुदुर्गात २४ जून रोजी मुसळधार ते अतीमुसळधार तर २५ ते २७ जून या तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.