Just another WordPress site

कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंश जातीच्या बैलांची यावल पोलिसांच्या सहकार्यातून सुटका !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

येथील चोपडा मार्गावरील एका पत्रांच्या शेडमधून १७ गोवंश बैल जातीचे जनावरे पोलीसांच्या धडक कारवाईत नुकतेच जप्त करण्यात आले असुन चार जणांंविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील कारवाईमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहिती अशी की,काल दि.२५ जुन २३ रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास यावल शहरातील यावल चोपडा मार्गावरील ख्वाजा मस्जिदच्या पाठीमागे तिन पत्री शेडमध्ये जाकीर खान साबिर खान,उस्मान शेख सुलतान,शकील खान निसार खान राहणार डांगपुरा आणी अत्ताऊल्ला खान ओबेदुल्ला खान राहणार खिरनीपुरा यावल या पैक्की वरील तिघांनी अवैधरित्या कत्तलीच्या ईराद्याने गोवंश जातीच्या गुरांना पुरेशा चाऱ्या पाणीची व्यवस्था न करता अत्यंत निर्दयीपणे बेकायद्याशीररित्या बांधुन ठेवलेल्या अवस्थेत तसेच शहरातील खिरनीपुरा भागात राहणारे अत्ताउल्ला खान यांनी गोवंश जातीचा एक बैल अशी एकुण १७ गोवंश जातीचे १ लाख ५८ हजार रूपये किमतीचे बैल घरासमोर बांधुन ठेवल्याची गुप्त माहितीच्या आधारावर पोलीसांनी केलेल्या कारवाईत मिळुन आले आहे.याबाबत यावल पोलीस ठाण्यातील कर्मचारी सुशिल गुघे व असलम खान दिलावर पठाण यांच्या फ़िर्यादी वरून चार जणांविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.तर पोलीसांनी जप्त केलेले सर्व बैलांची आरोग्य तपासणी तालुका पशु चिकित्सक आर.सी. भगुरे यांनी केली असुन या सर्व गुरांना गोशाळेत पाठविणार असल्याचे पोलीसांनी सांगीतले आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सहाय्यक फौजदार असलम खान पठान व पोलीस कर्मचारी सुशिल घुगे हे करीत आहे. पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईमुळे गोवंशची बैकायद्याशीर गुरांची वाहतुक करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.