यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
शहरातील महावितरण कार्यालयासमोर लावण्यात आलेली मोटरसायकल अज्ञात चोरट्यांने लांबविल्याचा प्रकार नुकताच समोर आला असून याबाबत अज्ञात चोरटया विरूद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.सदरहू परिसरात मोबाइल व शेती साहीत्य तसेच ईतर चोऱ्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असल्याने पोलीस प्रशासनाने याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे असल्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहीती अशी की,किरणसिंग कृष्णाजी पाटील वय २८ वर्ष राहणार शिवाजी नगर यावल यांची एमएच १९ सिएन ६५४३ या क्रमांकाची सुमारे २० हजार रुपये किमती बजाज पल्सर ही मोटरसायकल दि.२४ जुन रविवार रोजी चोपडा रोडवरील साईबाबा मंदीराजवळील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर कुणीतरी अज्ञात चोरट्यांने चोरून नेल्याची फिर्याद यावल पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.सदरील चोरीच्या घटनेचा पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे.दरम्यान यावल शहरात व परिसरात मागील काही दिवसापासुन शेती साहीत्य व आठवडे बाजारच्या दिवशी नागरीकांचे मोबाईल चोरीस जाण्याच्या घटनेत वाढ झाली असुन पोलीस प्रशासनाने या विषयाकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे शहरवासियांमध्ये बोलले जात आहे.