यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) :-
तालुक्यातील अट्रावल शिवारातील महावितरण कंपनीच्या डीपीवरून हजारो रूपयांच्या विद्युत साहीत्याची अज्ञात चोरटयांनी चोरी केली असून याबाबत यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहिती अशी की,तालुक्यातील अट्रावल शिवारात दि.२५ जुन रोजी उखा विष्णु चौधरी यांच्या शेत गट क्रमांक ६१८१ च्या ग्रुप डिपी क्रमांक ९ वरील आणी डीटीसी ६३९३४८ जवळील पोल क्रमांक ७ वरील १००० मिटर तार किमत सुमारे ३२ हजार चोरीस गेल्याचे दिसुन आले तसेच डीपी व पोल क्रमांक १ आणी २ वरील उखा श्रावण चौधरी यांच्या शेतातील पोल क्रमांक ३ चा पोल हा इंजाळ नदीच्या पात्रात असुन या ठीकाणी विष्णु गोविंदा चौधरी यांच्या शेतातील पोल क्रमांक ४ व ७ त्याचप्रमाणे गट क्रमांक ३१ मध्ये हेमंत एकनाथ चौधरी यांचे शेत असुन डीपी क्रमांक १८ वरील डीटीसीवरील सुमारे ९८o मिटर तार किमत सुमारे ३० हजार रूपये व याच परिसरातील अन्य ठीकाणाहून मिळुन ७० हजार रुपये किमत असलेल्या महावितरण कंपनीच्या साहित्याची अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार हरिष पंडित निबांळकर वय ४८ वर्ष,प्रधान तंत्रज्ञ,महावितरण कंपनी सांगवी कक्ष यावल उपविभाग यांनी दिल्याने अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.