Just another WordPress site

सोशल मिडीयावरील अफवांची शहानिशा करूनच निर्णय घ्या-पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड

भुसावळ-पोलीस नायक(प्रतिनिधी):-मागील काही दिवसांपासून व्हाट्सअप,फेसबुक आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी आली किंवा चोर आलेले आहेत अशा प्रकारच्या अफवा फिरत आहेत.अशा अफवांमुळे इतर जिल्ह्यात जमावाकडून बहुरूपी,वाटसरू,भिकारी व अन्य निष्पाप लोकांना जबर मारहाणीचे प्रकार घडले आहेत.त्यातून मारहाण करणाऱ्यांवर गंभीर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत.सध्या भुसावळ शहरात व परिसरात अशाच प्रकारच्या अफवा पसरविल्या जात आहेत व लोकांच्या मनात भीती पसरविली जात आहे.तरी अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये तसेच सोशल मीडियावरील अफवांची शहानिशा करूनच निर्णय घ्यावा असे आवाहन भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी केले आहे.

तरी भुसावळ शहरात व परिसरातील जनतेस आवाहन करण्यात येत आहे की,अशी काही माहिती मिळाल्यास तातडीने पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.जर कोणी अशा अफवा पसरवीत असेल तर त्याचे नाव पोलिसांना कळवावे.बातमीची खात्री केल्याशिवाय सोशल मीडियावर आलेला कोणताही मेसेज अन्य ठिकाणी फॉरवर्ड करू नये.सोशल मीडियातून आलेल्या मेसेजवर डोळे झाकून विश्वास ठेवु नका.अफवा पसरविणाऱ्या तुमच्या प्रत्येक पोस्टवर पोलिसांचे लक्ष आहे.याबाबत अफवा पसरविणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.अफवेला बळी पडून आपल्या हातून गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे लोकांनी स्वतःहून कायदा हातात घेऊ नये व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे असे भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.