Just another WordPress site

पांढरी येथे ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाद्वारे आमदार रवी राणा यांच्यातर्फे जनता दरबार

गोपाल शर्मा,पोलीस नायक

अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-

येथील आमदार रवी राणा यांच्या पुढाकाराने भातकुली तालुक्यातील पांढरी येथे ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत आ.रवीभाऊ राणा यांच्यातर्फे जनता दरबार उपक्रम आज दि.२७ जून मंगळवार रोजी राबविण्यात आली.यानिमित्ताने सर्व शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत जनतेच्या समस्याचे तात्काळ निराकरण करण्यात आले.यावेळी आमदार रवी राणा यांनी जनसामान्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उचलले अभिनव उपक्रमाद्वारे अनेक वर्षांच्या प्रलंबित समस्या मार्गी लागल्याने नागरिकांमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला आहे.

या कार्यक्रमादरम्यान १०८० नागरिकांना पीआर कार्ड व सनद चे वाटप,३७५ लोकांना संजय गांधी निराधार योजना,श्रावण बाळ योजना,विधवा, परितक्त्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ तात्काळ मंजूर करण्यात आला तसेच हातूर्णा,गोपगव्हाण,अळनगाव,कुंड खुर्द येथील पुनर्वसन गावांमध्ये  पावसाळ्यात अंधाराचे साम्राज्य राहात असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका असतो म्हणून आ.रवी राणा यांच्या पुढाकाराने ४०० विद्युत पोल,लाईट व्यवस्था आदी मंजूर करून सर्व गावात रात्रभर उजेड राहील अशी व्यवस्था करण्यात आली.त्याचबरोबर हवामान खात्याचा अंदाज बघता शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये,शेतकऱ्यांना हंगाम चांगला यावा यासाठी कृषी विभागाने दक्षता घ्यावी,बोगस बियाणे पुरवठा करणाऱ्या कंपनी वितरक यांच्यावर कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश देऊन या हंगामात युरिया व खते यांचा तुटवडा होणार नाही याची कृषी विभागाने दक्षता घ्यावी असा सल्ला त्यांनी अधिकारी व नागरिकांना दिला.या जनता दरबारात महसूल,आरोग्य,शिक्षण,एमएसईबी,भूमी अभिलेख,नगर पंचायत आदी विभागांशी संबंधित समस्या जागेवरच तात्काळ मार्गी लावण्यात आल्या.या जनता दरबारात आमदार रवी राणा, उपविभागिय अधिकारी रिचर्ड मानधन,तहसीलदार लोखंडे,कृषी अधिकारी फुनसे,मंडळ अधिकारी चतुर साहेब,नायब तहसीलदार श्री. रासेकर,तलाठी श्रीमती राऊत,लांडगे,भगत,आजयसिंग चव्हाण,हातुर्णा सरपंच भरती गौरकर,गिरीश कासट,सुमेध खांडेकर,गौरव पानसे,गोपगव्हान सरपंच मंगेश पेढेकर,वासेवडी सरपंच अविनाश सणके,अलनगाव सरपंच गौतम खंदारे,मंगेश पाटील इंगोले,राजू जोंधळे,भूषण उमाळे ताई,सागर तोडे,गोलू वाने,सागर वाणे,शैलेश मेहरे,सूरज वणखदे,मिलिंद अवघड,राजू घाते,सुधाकर गौर्कर,पद्माकर गुल्हाने आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.