जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
एकनाथ खडसे नवीन मालक सांगेल त्याप्रमाणे वागताहेत व ते त्यांच्या इशाऱ्यावर नाचत आहेत तसेच जमिनीमध्ये त्यांनी तोंड काळे केले नसते तर काळे झेंडे दाखविण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती ते परिवारात राहिले असते अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असून शासन आपल्या दारी अभियानांतर्गत जळगाव जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी मंगळवारी येथे आले असता फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.कापूस,पाण्यासह जिल्ह्यातील इतर प्रश्न सोडविण्याचा निर्णय न घेतल्यास मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांना जळगाव येथे काळे झेंडे दाखविण्याचा इशारा खडसे यांनी दिला होता त्याविषयी फडणवीस यांनी अशा काळय़ा झेंडय़ांना घाबरणारे लोक आम्ही नाहीत असे सांगितले. आम्ही जनतेसाठी काम करतो आहोत.जनतेला फायदा देण्यासाठी येथे आलो आहोत.जळगावची जनता आमच्याबरोबर आहे असे त्यांनी नमूद केले आहे.
यावेळी केळी विकास महामंडळासाठी १०० कोटींच्या निधीची तरतूद करीत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.शासन आपल्या दारी अभियानांतर्गत मंगळवारी येथील पोलीस कवायत मैदानावर लाभार्थ्यांना लाभाचे वाटप मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.दुसरीकडे कपाशी दराविषयी कोणतीही घोषणा न केल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखविले तसेच ठाकरे गटाकडूनही निषेध करण्यात आला.या अभियानाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन गावागावांत जात आहे त्याचा फायदा सर्वसामान्यांना होऊ लागला आहे त्यामुळे काही लोकांना पोटदुखी सुरू झाली आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे.वर्षभरात एवढे काम झाले तर पुढील दीड वर्षांत किती कामे होतील अशी धास्ती विरोधकांना सतावत असल्याचा टोला शिंदे यांनी लगावला आहे.’शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाला उपस्थित रहा नाहीतर तुमची शिधापत्रिका रद्द करू अशा धमक्या मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी गर्दी करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहेत.असले प्रकार जनता खपवून घेणार नाही या शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात संताप व्यक्त केला आहे.