Just another WordPress site

“शासन आपल्या दारी आणि शेतकरी झाला भिकारी” !एकनाथ खडसेंचे फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचा भाग म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दि.२७ जून मंगळवार रोजी जळगाव दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी कापूस दराच्या प्रश्नावरून शिंदे-फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिल्यानंतर आता एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जुंपली आहे.एकनाथ खडसेंनी मालक बदलला आहे.नवीन मालक जसे सांगतील तसे एकनाथ खडसे वागतात त्यांनी जमिनीत (भूखंड घोटाळा) काळे तोंड केले नसते तर त्यांना नवीन मालकाकडे जाण्याची वेळ आली नसती अशी टीका फडणवीसांनी केली होती फडणवीसांच्या या टीकेला एकनाथ खडसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून मी मालक बदलला असे म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या कापसाला भाव द्या.तुम्हीही मालक बदलला होता सत्तेसाठी आणि मुख्यमंत्रीपदासाठी तुम्ही लाचार होऊन अजित पवारांबरोबर सरकार स्थापन केले होते हा इतिहास पुसता येणार नाही.मी पुन्हा येईन,मी पुन्हा येईन,मी पुन्हा येईन…असे म्हणता म्हणता तुमचा फौजादाराचा हवालदार झाला तुम्ही हे सत्तेसाठी केले मग दुसऱ्यांना दोष का देत आहात अशी टीका एकनाथ खडसेंनी केली आहे.
मी काळे तोंड केले असे तुम्ही म्हणता परंतु  तुमच्या मंत्रिमंडळामध्ये निम्म्यापेक्षा जास्त भ्रष्ट लोक आहेत.त्यांच्यावर तुम्हीच आरोप केले होते असे भ्रष्ट लोक तुम्हाला चालतात का? माझे मागणे साधे असून मला तुमच्या अशा भानगडीत पडायचे नाही.मला ‘शासन आपल्या दारी’ यालाही विरोध करायचा नाही.माझे म्हणणे एवढेच आहे की कापसाला भाव द्या.आज शासन आपल्या दारी आणि शेतकरी झाला भिकारी अशी अवस्था आहे.५० टक्क्याहून अधिक कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे.पेरण्या सुरू व्हायची वेळ आली आहे मात्र शेतकऱ्यांकडे पेरणीला पैसा नाही त्यांना किमान ६ हजार रुपये प्रति क्विंटल अनुदान द्यावे अशी आमची मागणी आहे असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.