यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
येथील जे टी महाजन इंग्लिश स्कुलमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने आर्कषक वस्त्र परिधान करून विद्यार्थ्यांच्या मोठया सहभागातुन उत्साहाच्या व भक्तीमय वातावरणात आज दि.२८ जून बुधवार रोजी वारकरी दिंडी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावल शहरात आज आज दिनांक २८ जुन रोजी जे टी महाराज इंग्लिश स्कुल यावल च्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंड्डी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील दिंडी दरम्यान विद्यार्थी व विद्यार्थ्यांनीच्यावतीने वारकऱ्यांचे सुंदर व आर्कषित वस्त्र परिधान करून विठ्ठल,रुक्मिणी,निवृत्ती,ज्ञानदेव, सोपानदेव,मुक्ताबाई तसेच भिंत चालवणारे ज्ञानेश्वर यांचे सचिव देखावे करण्यात आले होते तसेच मोठ्या विद्यार्थीनीच्या हस्ते लेझीम, डबेल्स,टिपरे,टाळ यांच्या तालावर हरीनामाचा गजर करण्यात आला.प्रसंगी मोठ्या विद्यार्थ्यांनी काडी आखाड्याचे खेळ खेळले तर मुलींनी वारकऱ्यांच्या फुगड्या खेळून आकर्षित केले.सदरील कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या प्राचार्य रंजना महाजन व प्राचार्य किरण खेट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.सदरील दिंडी स्कुलपासुन शहरातील प्रमुख मार्गाने महाजन गल्लीतील विठ्ठल मंदीरात दर्शन घेऊन समारोप करण्यात आला.भक्तीमय व उत्साहाच्या वातावरण काढण्यात आलेल्या दिंडी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांच्यासह स्कुलचे स्कुलचे विद्यार्थीनी विद्यार्थी यांनी महत्वाचे परिश्रम घेतले.