सादिक शेख,पोलीस नायक
धामणगाव बढे (प्रतिनिधी) :-
बकरी ईद व आषाढी एकादशी हे एकाच दिवशी येत असून काही अनुचित प्रकार घडू नये त्या अनुषंगाने धामणगांव बढे पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे यांच्या मार्गदशनाखाली धामणगांव बढे ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पिंपळगाव देवी येथे विदर्भ खान्देश सीमेवर चेक पोस्ट उभारून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनाची कसून चौकशी करण्यात येत आहे.
२९ जून रोजी बकरी ईद व आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे.या दोन्ही उत्सवादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या आदेशानुसार व पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे यांच्या मार्गदशनाखाली विदर्भ व खान्देश यांच्या सीमेवर पिंपळगाव देवी येथे रावटी टाकुन पोलीस चेक पोस्ट उभारून या ठिकाणावरून जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांची कडक चौकशी व तपासणी करण्यात येत आहे.सदरील तपासणी दरम्यान वाहनधारकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे यांनी केले आहे.