Just another WordPress site

किनगाव येथे आषाढी एकादशी निमित्ताने दिंडी सोहळा उत्साहात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

तालुक्यातील किनगाव येथील आदीवासी समाज संचलीत के.ओ.एम.इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये दि.२८ जून आषाढी एकादशी निमित्ताने शाळकरी विद्यार्थ्यांच्या सहभागाने वारकरी दिंडी काढण्यात येवुन उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.

यानिमित्ताने किनगाव येथे दि.२८जून२३ बुधवार रोजी अमीर प्रतिष्ठान संचलित के.ओ.एम.इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.या दिवशी परंपरेनुसार मागील पाच दशकापासुन भगवान विष्णुचे एकरूप समर्पित असलेल्या विठ्ठलाची मान्यवरांच्या हस्ते पंढरपुर तिर्थक्षेत्र येथे महापुजा केली जाते.यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल,रुक्मिणी,वारकरी यांच्या वेशभूषा परिधान करून बाल दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी अमीर पब्लिक स्कुल आणि अमीर कला व वाणिज्य महाविद्यालय किनगावचे संचालक कार्यध्यक्ष सचिन तडवी व संचालक मंडळ,मुख्याध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी तसेच पालक वर्ग उपस्थित होते.दिंडी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे सर्व संचालक मंडळ,मुख्याध्यापक गणेश मेश्राम यांच्यासह शिक्षक,शिक्षीका, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थीनी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.