सादिक शेख,पोलीस नायक
मोताळा तालुका (प्रतिनिधी) :-
छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेचे आयोजन दि.२५ जून २३ रोजी करण्यात आले होते.या स्पर्धेत राज्यभरातील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.सदरील स्पर्धेत तालुक्यातील धामणगाव बढे येथील कु.रिया सागर हागे या विद्यार्थिनीने चौथा क्रमांक मिळवत उत्तुंग यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत शंभर गणिताचे प्रश्न सहा मिनिटात सोडविणे आवश्यक होते सदरहू कु.रिया सागर हागे या विद्यार्थीनीने योग्य वेळेत हि गणित सोडवत संपूर्ण विभागातून चौथा क्रमांक मिळविला आहे.सदरील यशाबद्दल कु.रिया हागे या विद्यार्थिनीचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.ही विद्यार्थिनी शिवांश प्रोॲक्टिव अबॅकस धामणगाव बढेची विद्यार्थिनी असून या क्लासमधील ३१ विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते त्यापैकी रिया सागर हागे या विद्यार्थिनीचा चौथा क्रमांक तर इतर ३० विद्यार्थ्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे यश संपादन करून सर्वच विद्यार्थ्यांनी ट्रॉफी जिंकली आहे.
या विद्यार्थ्यांच्या यशाचे श्रेय त्यांचे आई-वडील,आजी आजोबा व शिवांश प्रोॲक्टीव अबॅकस क्लासेसचे संचालक अभिमन्यु सपकाळ व मनोज जंजाळे यांना देण्यात येत आहे.