चोपडा येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडी सोहळा
विठूनामाच्या गजरासह पर्यावरणाचा जागर;
डाॅ.सतीश भदाणे,पोलीस नायक
चोपडा-तालुका (प्रतिनिधी) :-
‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल,ज्ञानोबा तुकाराम,रामकृष्ण हरी’ या विठूनामाच्या गजरासह ‘वृक्ष बोलती मानवाला नका तोडू आम्हाला,हिरवी हिरवी गार गार-झाडे लावू चार चार,झाडांना जगवाल तर सुखाने जगाल’ यासारख्या पर्यावरण जागराच्या घोषाने अवघा परिसर दुमदुमला होता. साधुसंतांनी विठुरायाबद्दलची कवने आणि अभंग लिहिताना निसर्गाचे,वृक्षांचे मानवी जीवनातील महत्त्व सांगितले आहे.हा योग साधत दि.२९ जून गुरुवार रोजी आषाढी एकादशी निमित्त येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाच्यावतीने वृक्षदिंडी व पंढरीच्या विठुराया सोबतच बालतरुच्या पालखीची आज मिरवणूक काढण्यात येऊन पर्यावरण रक्षणाचा संदेश शहरात देण्यात आला.
यानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी वृक्ष दिंडीचे पूजन संस्थेच्या अध्यक्षा पुनम गुजराथी,कुमुदिनीबेन गुजराथी,छायाबेन गुजराथी,उद्योजक आशिष गुजराथी,वसंतलाल गुजराथी,डॉ.आशिष गुजराथी,माजी गटशिक्षणाधिकारी डॉ.भावना भोसले,मुख्याध्यापक सुनील चौधरी,वनक्षेत्रपाल तुषार देवरे यांच्या हस्ते करण्यात आले.विद्यालयापासून आरंभ करण्यात आलेली हि दिंडी गुजराथी गल्ली,गोल मंदिर,मुख्य बाजारपेठ,गांधी चौक,थाळनेर दरवाजा,धनगर गल्ली मार्गे शाळेत येऊन समारोप करण्यात आला व याठिकाणी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. सदरील दिंडी दरम्यान विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.डी.चौधरी व पर्यवेक्षक एस.बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिक्षक व्ही.वाय. शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली बँड पथक तयार करण्यात आले त्याचबरोबर एस.आर.सोनवणे,व्ही.डी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली आकर्षक पालखी सजविण्यात आली होती.पारंपारिक मराठमोळ्या वेषातील कलशधारी मुलींना वाय.टी.शिरसाठ,के.एन.देशमुख,एस.आर.माळी या शिक्षिकांचे मार्गदर्शन लाभले.मुलींच्या लेझीम पथकाला ए.आर.महाजन,व्ही.पी.महाले यांचे मार्गदर्शन लाभले तर बाल वारकऱ्यांचे तालबद्ध संचलन एस.आर.बारी,पी.एस.चव्हाण यांनी करवून घेतले.बी.जी.माळी,सी.पी.चौधरी,बी.आय.लोहार,व्ही.यु.पाटील,व्ही.डब्ल्यू.पाटील,वाय.एन. बारी,एस.एम.भलकार या शिक्षकांसह डी.जे.मिस्तरी,एस.बी.पाटील,बी.बी.भालेराव यांनी परिश्रम घेतले तर बी.ए.धर्माधिकारी,जी.जी.पाटील, आर.जी.गुजराथी,बी.एस.शिरसाळे यांचे सहकार्य लाभले.यावेळी विद्यालयाचे बँड पथक,पारंपारिक मराठमोळ्या वेषातील कलशधारी मुली,वारकरी वेषातील टाळ वाजवणारे बाल वारकरी,लेझीम पथक,बालतरुची (रोपटे) सुशोभित पालखी यांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.दिंडीनंतर शाळेच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.या दिंडी सोहळ्यात चोपडा सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल तुषार देवरे,पोलीस नायकचे तालुका प्रतिनिधी डाॅ.सतीश भदाणे,वनपाल रवींद्र भामरे,रविंद्र मोरे,महेश पाटील,आगार रक्षक किरण पाटील,वनरक्षक एस के कंखरे,अमोल पाटील, उज्वला बारेला,रिला पावरा,प्रमिला अंबुरे,जयश्री धनगर,गोविंदा चौधरी,मदन मराठे,विजय चौधरी,अंकुश भिल यांची उपस्थिती होती.