बीड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी मोठा निर्धार केला असून मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे तसेच २०२४ इतिहास घडवणारे म्हणजेच बदलणारे वर्ष आहे असेही पंकजा मुंडे म्हणाल्या त्या बीडमधील एक सभेत बोलत होत्या.मला राजेंद्र मस्के म्हणाले फेटा बांधा.मी म्हटले की,फेटा बांधणार नाही.मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी फेटा बांधणार नाही.ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आल्यावर गळ्यात कोणतीही फुलाची माळ गळ्यात घालणार नाही असं सांगितले होते.आता ओबीसी आरक्षण वाचले आणि लोकांनी गळ्यात हार घातले असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
आपल्याला दुधही पोळलेले असून ताकही फुंकून पिण्याची वेळ आली आहे त्यामुळे २०२४ हे वर्ष इतिहास घडवणारे म्हणजेच इतिहास बदलणारे वर्ष आहे.मला माध्यमांनी विचारले की तुम्ही आमदार,खासदार किंवा ग्रामपंचायत सदस्य नाही मग काय सर्व पक्ष तुम्हाला ऑफर देतात त्यावर त्यांनी म्हटले की ते मला माहिती नाही पण मी सर्वसमावेशक चेहरा झालेली आहे.मराठा आरक्षणाबाबत पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधानावर मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून आरक्षणाच्या नावाखाली सरकार आपली जबाबदारी झटकत नाही. आर्थिकदृष्ट्या ज्या माध्यमातून समाजातील मुलांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना शिकवता येईल हे सर्व प्रयत्न राज्य सरकार करत आहे. आरक्षणासाठीही आपण प्रयत्न करत आहोत पण त्यासाठी भावनिक मुद्दा करून शेवटी काही साध्य होणार नाही असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले आहे.