यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
येथील शासकीय आय.टी.आयचे शिल्प निदेशक व्ही.पी.चौधरी हे ३० जुन रोजी आपल्या ३६ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत.
या निमित्ताने येथील शासकीय आय.टी.आयमध्ये आयोजित एका छोटेखानी कौटुंबीक कार्यक्रमात त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसह प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांना सेवानिवृत्तीपर निरोप देण्यात आला.याप्रसंगी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एस.एम.पाटील,प्राचार्य टी.आर.पाटील,शिल्प निदेशक श्रध्दा फेगडे,एस.एम.बडे,ए.वाय.भाबड,व्ही.व्ही.महाजन,पी.व्ही.न्याहळदे,पी.एम.तांबट,बी.डी.फालक, ए.एस.येवले,बी.एम.देशमुख,एन.टी.दालवाले,डी.एल.तडवी,रागिनी पाटील व प्रशिणार्थी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.