“शिवसेनेचा भगवा झेंडा उतरवण्यासाठी दिल्लीचे दोन बोके आणि महाराष्ट्रातील ४० खोके कारस्थान करत आहेत” संजय राऊत यांची जोरदार टीका
ठाकरे गटाकडून आज दि.१ जुलै २३ शनिवार रोजी मुंबईत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्च्याला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत.हा मोर्चा मेट्रो सिनेमापासून मनपा कार्यालयापर्यंत जाणार आहे या मोर्च्याला सुरुवात होण्यापूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.शिवसेनेचा भगवा झेंडा उतरवण्यासाठी दिल्लीचे दोन बोके आणि महाराष्ट्रातील ४० खोके जे काही कारस्थान करत आहेत,ते कारस्थान उधळून लावण्यासाठी हा मोर्चा आहे अशी टीका संजय राऊतांनी केली ते ठाकरे गटाच्या महामोर्च्यात बोलत होते.