Just another WordPress site

डोंगर कठोरा येथील भक्तांची गुरुपौर्णिमेनिमित्त व्यास मंदिरापर्यंत पायी दिंडी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

तालुक्यातील डोंगर कठोरा येथील पंचवटी विठ्ठल मंदिर व गढीवरील विठ्ठल मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.३ जुलै सोमवार रोजी श्री.गुरु पोर्णिमेनिमित्ताने पंचवटी विठ्ठल मंदिर ते श्री व्यास नगरी व्यास मंदिर यावल पर्यंत पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले.

सदरील दिंडी सोहळा सालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावर्षी दिंडीचे हे सलग १५ वे वर्ष असून या समारोहात लहान थोर मुले,मुली,महिला व पुरुष यांनी या दिंडीत सहभाग नोंदविला.सदरील दिंडी हभप दिनकर महाराज,हभप दत्तात्रय महाराज व हभप रवींद्र महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सातोद कोळवद मार्गे रवाना करण्यात आली.दिंडी मार्गात सातोद येथील भाविक भक्त हभप पंडित पाटील यांच्याकडे सर्व दिंडीस जेवणाचा कार्यक्रम घेण्यात आला.या ठिकाणी भजन,प्रवचन होऊन दिंडीत सातोद कोळवद येथील वारकरी सहभागी होऊन दिंडी व्यास मंदिराकडे मार्गस्थ करण्यात आली.दिंडी कार्यक्रमानिमित्ताने भुरा सोनवणे व सलीम मिस्त्री यावल यांच्या वतीने चहापान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सदरील दिंडी डोंगर कठोरा येथे गावात परत आल्यानंतर संध्याकाळी संपूर्ण गावातून दिंडी प्रदक्षिणा होऊन दहीहंडी फोडण्याचा व रात्री विठ्ठल मंदिराजवळ भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

सदरील दिंडी सोहळ्यात हभप दिनकर महाराज,हभप दत्तात्रय महाराज,हभप रवींद्र महाराज,सुरेश भिरूड,गोपाळ आमोदे,नामदेव झोपे,गिरधर राणे,सुरेश कळसकर,दिनकर पाटील,नारायण कुरकुरे,डॉ.सुरेश भारंबे,ज्ञानदेव पाटील,विलास राणे,धर्मा बाऊस्कर,राहुल आढाळे,सलीम मिस्त्री यावल,जगदीश मुऱ्हेकर,दगडू पाटील,विकास कोल्हे,चंदन सोनवणे,पंडित पाटील,ज्ञानदेव पवार,भुरा सोनवणे,खुशाल कोळी,दिनेश झोपे,पंडित कोळी,प्रकाश झोपे,कुंदन धनगर,सुपडू कोळी,रमेश सोनार,देविदास सोनार,तिलोत्तमा झोपे,कल्पना झांबरे,छाया झांबरे,आशा झोपे,रोहिणी झोपे,तेजस्विनी झोपे,देवयानी झांबरे,इंदू गाजरे,सुनीता भारंबे,पद्माबाई पाटील,हेमलता जावळे,हेमलता राणे,आशा जावळे,सुमनबाई पाटील,बेबाबाई पाटील,सुबाबाई झोपे,प्रतिभाबाई पाटील,इंदुबाई पाटील,शोभा धनगर,सुरेखा सुपे यांच्यासह पंचवटी विठ्ठल मंदिर व गढीवरील विठ्ठल मंदिरातील महिला व पुरुष मंडळांनी सहभाग नोंदविला.

Leave A Reply

Your email address will not be published.