Just another WordPress site

शरदचंद्रिका पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे जिपीएटी परीक्षेत यश

डाॅ.सतीश भदाणे,पोलीस नायक

चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-

येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सालाबादप्रमाणे यावर्षी देखील जी पॅट २०२३ या पदव्युत्तर प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या जिपीएटी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.महाविद्यालयातील परीक्षेस बसलेल्या ६७ विद्यार्थ्यांपैकी ९ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

यात खुशबू सुनील पाटील (९७.६२),श्वेता प्रदीप चौधरी (९६.६०),अश्विनी सुनील बालापुरे (९५.८२),वैष्णवी संदीप धनगर (९४.०७),वैष्णवी रामकृष्णा पाटील (९१.६०),अजय शांताराम जाधव (६५.२५),उमेश नंदलाल जैन (६४.०६),संपत केला पाडवी (६१.८१) व नचिकेत रमाकांत खैरनार (२७.४२) या विद्यार्थ्यांनी यश मिळविले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनचे कौतुक व अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट संदीप सुरेश पाटिल, संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती आशाताई विजय पाटील,संस्थेच्या सचिव डॉ.स्मिताताई संदीप पाटील यांनी केले.तर आम्हाला अशा विद्यार्थ्यांचा अभिमान आहे आणि आम्हाला खात्री आहे की ते त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांमध्ये ते यशस्वी ठरतील.आम्ही सर्व यशस्वी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो अश्या शुभेच्छा संस्थेचे अध्यक्ष ऍड संदीप सुरेश पाटील यांनी दिल्या.प्रसंगी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी तत्पर असणारे कॉलेजचे प्राचार्य डॉ.गौतम पी वडनेरे तसेच महाविद्यालयाचे प्रबंधक प्रफुल्ल मोरे,सर्व विभाग प्रमुख ,जी पॅट सेल,शैक्षणिक प्रभारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.