Just another WordPress site

यावल महाविद्यालयास सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे यांची सदिच्छा भेट

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे यांनी नुकतीच सदिच्छा भेट देऊन महाविद्यालया अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती जाणुन घेतली.

यावेळी सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव मार्फत विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागा मार्फत विविध उपक्रम राबविले जातात.यात त्यांनी जि-२० युवा संवाद@ २०४७ याबाबत सविस्तर माहिती दिली.प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे यांचा महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.ए.पी.पाटील प्रा.एम.डी.खैरनार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.हेमंत येवले,किमान कौशल्य विभागाचे प्रा.मुकेश येवले,डॉ.एस.पी.कापडे,डॉ.एच.जी.भंगाळे,डॉ.आर.डी.पवार,डॉ.पी.व्ही.पावरा आदी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वितेकरिता मिलिंद बोऱघडे,संतोष ठाकूर,रमेश साठे,डी.डी.पाटील यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.