यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
प्रदेश काँग्रेस पक्षाच्या आदेशानुसार व जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे सुचनेनुसार जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार,आमदार शिरीषदादा चौधरी,माजी खासदार डॉ.उल्हास पाटील,माजी आमदार रमेशदादा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुका काँग्रेस अध्यक्ष आप्पासाहेब प्रभाकर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्तरीय काँग्रेस कमेटी व मंडळ स्तरीय कमेटी तसेच बुथ कमेटी तयार करणे संदर्भात तालुका भर दोरे निश्चित करण्यात आले आहेत.त्या अनुषंगाने काल दि.५ जुलै बुधवार रोजी सकाळच्या सत्रात न्हावी बामणोद जिप गटातील म्हैसवाडी,बामनोद, आमोदे,विरोदा या गावात तर दुपारच्या सत्रात पिंपरुड,न्हावी,मारुळ या गावात सदर अभियान राबविण्यात आले.यावेळी गावातील कार्यकर्ते गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळाला यात प्रामुख्याने तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सदर अभियानात प.स.गटनेते शेखरबापू पाटील,प्रदेश सरचिटणीस जलील पटेल,गटप्रमुख सुनील फिरके,म्हैसवाडी येथे सरपंच,उपसरपंच, सर्व सदस्य,कार्यकर्ते,गावकरी उपस्थित होते,बामनोद येथे माजी गटनेते विलाससेठ तायडे,सरपंच राहुल तायडे,उपसरपंच गिरीश जावळे,कैलाससेठ तायडे,माजी सरपंच दिलीप सर,ससाणे सर,गणप्रमुख तौफीक शेख त्यांचे सर्व ग्रा.प सदस्य गावकरी आणि कार्यकर्ते तर आमोदे येथे सरपंच प.स.माजी सदस्या कालीमा तडवी,सरपंच रूकसना तडवी,उपसरपंच पौर्णिमा भंगाळे,ग्रा.प सदस्य राजेंद्र पाटील आणि त्यांचे सर्व ग्रा.प सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते.विरोदा येथे उपसरपंच विनोद झाल्टे,अमोल चौधरी आणि ग्राप सदस्य कार्यकर्ते गावकरी उपस्थित होते.पिंपरुड येथे सरपंच योगेश कोळी,अजय पाटील,ग्रा.प सदस्य कार्यकर्ते गावकरी उपस्थित होते.न्हावी येथे प.स माजी सदस्य सरफराज तडवी,सरपंच देवेंद्र चोपडे,उपसरपंच हेमांगी महाजन,ग्रा.प सदस्य नदीम पिंजारी,वाघुळदेसर,वसंत महाजन सह ग्रा.प सदस्य गावकरी कार्यकर्ते उपस्थित होते.मारुळ येथें जेष्टनेते जावेद जनाब,सरपंच सय्येद असद,जिया सर,इखलास सय्येद,मधू भाऊ,प्रवीण हटकर, हैदर जनाब,अतिउर रहेमान सह कार्यकर्ते युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.