यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :-
तालुक्यातील किनगाव बु॥ येथील रामरावनगरमध्ये नागरीकांचा रहीवास झाला असुन या भुखंडाचे मालक (विकासक) यांनी नागरीकांच्या सार्वजनिक हितासाठी वापरण्यात येणाऱ्या हक्काच्या खुल्या भुखंडावर स्वतः अतिक्रमण करून ठेवले असुन हे अतिक्रमण खाली करून मिळावे अशी मागणी नागरीकांनी ग्रामपंचायतकडे निवेदनाव्दारे केली आहे.
याबाबत किनगाव येथील रामराव नगर क्षेत्रातील राहणारे सर्व प्लाँट्स एन.ए.झालेले असुन संपुर्ण प्लाँट्सचे बांधकामही झालेले आहे तर या ठीकाणी असलेल्या ओपन प्लेस मध्ये(खुला भुखंड)सार्वजनीक हाँल,वृक्षारोपन,लहान मुलांना खेळण्यासाठी छोटा बगीचा व धार्मीक मंदीराचे बांधकाम करायचे आहे.मात्र सदरच्या सार्वजनीक जागेवर जागा मालकांनी (विकासक) यांनी स्वतः या ठीकाणी अतिक्रमण केले असुन सदरच्या खुल्या भुखंडावरील अतिक्रमण तात्काळ खाली करून सदर खाली भुखंड(ओपन प्लेस) कायद्याशीररित्या रामराव नगर रहिवासींच्या ताब्यात मिळावा अश्या आशयाचे निवेदन रामराव नगरवासीयांच्या वतीने किनगाव ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी प्रदिप धनगर यांना नुकतेच देण्यात आले.सदरील निवेदनावर रामराव नगर मधील रहीवासी संभाजी लक्ष्मण पालवे,प्रमोद नथ्थु पाटील,धनराज देवराम महाजन,सुधाकर रघुनाथ सावकारे,रवींद्र सुपडू महाजन,मंगलबाई शिवाजी पाटील,प्रतिभाबाई प्रताप महाजन,शरद नागो कोकाटे,शांताराम बाबुराव पाटील,मनीषा दिनेश पाटील,विजय शांताराम कापुरे,वासुदेव अवचित वराडे,प्रकाश गंगाराम पाटील,मुकेश शालिक पाटील,विनोद गंगाराम पाटील,शिवाजी अवचित वराडे,पवित्रा प्रदीप पाटील,शिवराम दौलत महाजन,योगेश रमेश पाटील, नंदू ओंकार ठाकूर,अशोक त्र्यंबक चौधरी,जनार्दन राजधर कोळी,दीपक प्रकाश चौधरी,कुणाल गजानन चौधरी, विनायक दौलत पाटील,कैलास मुकुंदा वराडे,मीना अनिल पाटील, कमल मुकुंदा इंगळे,रवींद्र शांताराम पाटील व प्रदीप सिताराम सोनार यांच्या स्वाक्षरी असुन या प्रसंगी किनगावचे सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील यांच्यासह रामराव नगरातील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.