“राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार?”
युतीवर चर्चा करायची असेल तर स्वतः राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यावर बोलतील-अभिजीत पानसे यांची स्पष्ट भूमिका
मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे विश्वासू अभिजीत पानसे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना भेटण्यासाठी शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या कार्यालयात आले यानंतर ते मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीचा प्रस्ताव घेऊन संजय राऊतांकडे आल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.सध्याच्या बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? यावर तर्कवितर्क लावले जात आहेत याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता अभिजीत पानसे यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली असून ते आज गुरुवार ६ जुलै रोजी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.तुम्ही मनसे-ठाकरे गटाच्या युतीचा प्रस्ताव संजय राऊतांकडे घेऊन आला होता का? या प्रश्नावर अभिजीत पानसे म्हणाले की,नाही मनसे पक्षात मी इतक्या मोठ्या स्थानावर नाही.मी राज ठाकरेंचा कट्टर सैनिक आहे त्यामुळे तशी वेळ येणार असेल तर मला माहिती नाही.युतीवर चर्चा करायची असेल तर स्वतः राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यावर बोलतील.
मी माझ्या वैयक्तिक कामासाठी संजय राऊतांना भेटण्यासाठी सामनाच्या कार्यालयात आलो होतो त्याचे वेगळे अर्थ लावू नका.या भेटीत राजकीय चर्चांचा काहीही संबंध नाही.माझे संजय राऊतांशी फार जुने संबंध आहेत.मला संजय राऊतांनीच राजकारणात आणले होते त्यामुळे मला त्यांना काही कामानिमित्त भेटायचे होते असे मत अभिजीत पानसे यांनी व्यक्त केले आहे.मी संजय राऊतांना बऱ्याच दिवसांपासून भेटलो नव्हतो मी त्यांना भेटायला घरी जाणार होतो पण ते सामनात आहे असे कळले म्हणून इथे सामना कार्यालयात आलो असेही अभिजीत पानसे यांनी नमूद केले आहे.