यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
येथील वकील संघाची वार्षीक सर्वसाधारण बैठक संपन्न झाली असून यात संघाच्या नुतन कार्यकारणीची निवड नुकतीच करण्यात आली आहे.यात अध्यक्षपदी ॲड.एस.आर.लोंढे यांची तर सचिवपदी ॲड.याकुब ए.तडवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
यावल येथे दि.४ जुलै मंगळवार रोजी यावल वकील संघाची सर्वसाधारण वार्षिक बैठक संपन्न होवुन यात संघाच्या नुतन कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे.मागील अनेक वर्षापासुन कोणतीही निवडणुक न घेता संपुर्ण कार्यकारणीची बिनविरोध निवड करण्याची परंपरा कायम ठेवत संघाच्या अध्यक्षपदी ॲड.एस.आर.लोंढे यांची तर सचिवपदी ॲड.याकुब ए.तडवी यांची व ग्रंथपालपदी ॲड.आकाश चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.या बैठकीस माजी अध्यक्ष ॲड.निलेश मोरे तथा कार्यकारणी सदस्य ॲड.एस.जी.कवडीवाले, ॲड.राजेश पी.गडे,ॲड.के.डी.पाटील,ॲड.नितिन एम.चौधरी,ॲड.अजय एम.कुलकर्णी,ॲड.अशोक आर.सुरळकर,ॲड.गोविंद एम.बारी, ॲड.खालीद ए.शेख,ॲड.उमेश सी.बडगुजर,ॲड.मोहीत शेख,ॲड.देवेन्द्र आर.बाविस्कर,ॲड.रियाज पटेल,ॲड.धिरज चौधरी,ॲड.सुलताना आर.तडवी,ॲड.राजेश बारी,ॲड.विनोद एम.परतणे,ॲड.शेखर तडवी,ॲड.गौरव पाटील,ॲड.भुषण महाजन आदी उपस्थित होते.याप्रसंगी नुतन कार्यकारणीतील बिनविरोध निवड करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत व सत्कार करण्यात येऊन भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.