यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :-
तालुक्यातील किनगाव येथील जळगाव जिल्हा मराठा समाज विद्या प्रसारक संस्था जळगाव द्वारे संचलित नेहरू विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने व्यासपीठ बांधकामाचे भुमिपुजन विद्यालयाची माजी विद्यार्थीनी व महाराष्ट्र पोलिस सेवेत कार्यरत असलेल्या नीता जगन्नाथ सुरवाडे यांच्या आई कलाबाई सुरवाडे यांच्या हस्ते तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थित नुकतेच करण्यात आले.
याबाबत संस्थेच्या वतीने या कामास मंजुरी मिळवण्याचा ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला होता.यात सन १९९५-९६ या शैक्षणीक वर्षात इ.१० वीत असलेल्या माजी विद्यर्थिनींनी मोलाचे योगदान दिले आहे.सदरील व्यासपीठाचे भूमिपूजन नेहरू विद्यालयाची माजी विद्यार्थीनी व महाराष्ट्र पोलिस सेवेत कार्यरत असलेल्या नीता जगन्नाथ सुरवाडे यांच्या आई कलाबाई सुरवाडे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.यावेळी नेहरू विद्यालयाचे चेअरमन उमाकांत रामराव पाटील,मुख्याध्यापक सी.के.पाटील,शिक्षणप्रेमी संभाजी पालवे,तुषार पाटील,योगेश पाटील, पंकज हिवराळे,विनोद तायडे,रवींद्र बोराडे,रवींद्र कोळी,मीना पाटील,बापू पाटील,डॉ.बियाणी,विलास चौधरी,नथ्थु धनगर,संतोष कोळी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,गावातील शिक्षणप्रेमी व इ.१० वीतील सन १९९५-९६ बॅचचे विद्यार्थी व पालक उपस्थित होते.