सादिक शेख,पोलीस नायक
मोताळा तालुका (प्रतिनिधी) दि.७ जुलै २३ शुक्रवार
तालुक्यातील बामंदा येथील रहिवाशी शेख शरीफ शेख बनू वय ४५ वर्षे या तरुणास घराच्या गच्चीवरील लोखंडी आसरीचा लाईनच्या तारांना स्पर्श झाल्याने इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना दि.६ जुलै रोजी घडली आहे.सदरील घटनेमुळे परिसरात एकच शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,तालुक्यातील बामंदा येथील रहिवाशी शेख शरीफ शेख बनू वय ४५ या तरुणाला लोखंडी असारीची काही कामानिमित्त गरज होती त्याने घराच्या गच्चीवर लोखंडी असारी आहे असे पाहून आसारी उचलण्याचा प्रयत्न केला असता असारीचा घराच्या वर असलेल्या इलेक्ट्रिक मेनलाईनला स्पर्श झाल्यामुळे विजेचा शॉक लागल्यामुळे शेख शरीफ हा इसम बेशुद्ध पडला.काही गावातील नागरिकांनी त्याला बेशुद्ध अवस्थेत धामणगाव बढे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता तेथील डॉक्टरांनी बुलढाणा येथे हॉस्पिटलमध्ये रेफर केले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.शेख शरीफ शेख बनू याच्या पश्चात पत्नी,दोन लहान मुले,एक मुलगी व आई असा आप्तपरिवार आहे.शेख शरीफ गावातील सर्व जाती धर्मात मिळून मिसळून राहत असल्यामुळे धामणगाव बढे या गावात सुद्धा गावातील नागरिकांशी चांगले संबंध प्रस्थापित केले होते.असा मनमिळावू व्यक्ति गेल्यामुळे बामंडा व धामणगाव बढे परिसरात या घटनेमुळे नागरिकांवर शोककळा पसरली आहे.तरी शासनाने व महावितरणाने मृतकाच्या परिवाराकरिता आर्थिक मदत जाहीर करून शेख शरीफ यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी गावकऱ्यांमधून केली जात आहे.