नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
राजस्थानमधील नेते आणि कार्यकर्त्यांनी संपूर्ण एकजूट राखली तर तिथे या वर्षांच्या अखेरीस होणारी विधानसभा निवडणूक जिंकता येईल असा विश्वास काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दि.६ जुलै गुरुवार रोजी आयोजित बैठकीत व्यक्त केला आहे तसेच सर्व नेत्यांनी शिस्त पाळावी आणि पक्षाच्या व्यासपीठाबाहेर बोलू नये असे निर्देश पक्षातर्फे देण्यात आले आहेत.पक्षात एकजूट राहिली तर आतापर्यंत राज्यात सत्ताधारी पक्षाचा विधानसभा निवडणुकीत पराभव होण्याची परंपरा खंडित करता येईल असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
काँग्रेस पक्षातर्फे दि.६ जुलै गुरुवार रोजी राजस्थान निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीला पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे,काँग्रेस नेते राहुल गांधी,पक्षाचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल,पक्षाचे राजस्थानचे प्रभारी सुखजिंदर सिंग रंधवा, प्रदेशाध्यक्ष गोविंग सिंह डोटासरा आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट उपस्थित होते.दरम्यान दुखापतीतून सावरत असलेले राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे दूरदृश्य प्रणालीतर्फे बैठकीला उपस्थित होते.