“शिवसेना-भाजपा युती किती मजबूत आहे व किती मनापासून झाली आहे ते आजच्या नीलमताईंच्या प्रवेशामुळे स्पष्ट झाले आहे” एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य
उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांचा शिवसेनेत प्रवेश झाला असून हा आज एक ऐतिहासिक क्षण आहे कारण त्यांच्या प्रवेशाला देवेंद्र फडणवीसही उपस्थित आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.शिवसेना-भाजपा युती किती मजबूत आहे आणि किती मनापासून झाली आहे ते आजच्या प्रवेशामुळे स्पष्ट झाले आहे.बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे सरकार,युतीचे सरकार आपण आणलेले आहे.बाळासाहेब ठाकरे,प्रमोदजी महाजन,अटलजी सगळ्यांना अभिप्रेत असलेली युती आपण केली आहे.केंद्रात भाजपाचे सरकार आहे त्याच धर्तीवर युती सरकार स्थापन व्हावे ही सगळ्यांचीच इच्छा होती असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.वर्षभरापूर्वी आमचे सरकार आल्यानंतर आम्ही राज्यात धडाकेबाज निर्णय घेतले.राज्यात युतीचे सरकार स्थापन व्हावे ही लोकांची इच्छा होती.आम्ही जे काम करतो आहे ते लोकांना पसंत पडत आहेत.संपूर्ण राज्यात आमच्या निर्णयांची चर्चा असून ज्यांना टीका करायची आहे त्यांना करुद्या आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.
२०१४ ते २०१९ हे युतीचे सरकार होते आणि देवेंद्र फडणवीस हे तेव्हा मुख्यमंत्री होते व मी त्या मंत्रिमंडळात होतो त्याही वेळी लोकहिताचे निर्णय घेतले पण दुर्दैवाने मधल्या काळात वेगळे सरकार होते त्या काळात प्रकल्प मंदावले होते विकासकामांना खिळ बसली होती पण आम्ही सरकार स्थापन केल्यानंतर लोकहिताचे जे निर्णय आहेत ते आम्ही घेतले आहे.बंद पडलेल्या प्रकल्पांनाही आम्ही चालना दिली.बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्ष आम्हाला दिला आहे असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.सर्वोच्च न्यायालयानेही काय निकाल दिला ते आपण पाहिले त्याचे काही लोक वेगळे अर्थ काढत आहेत ते काढू देत पण असे असताना पदाधिकारी,आमदार,खासदार,संघटनेचे जिल्हाध्यक्ष,पदाधिकारी खूप मोठ्या प्रमाणावर आमच्याकडे येत आहेत.मनिषाताईही आपल्याकडे आल्या.घटनात्मक उपसभापती असलेल्या नीलम गोऱ्हे यादेखील आपल्या बरोबर आल्या त्यांनी महिलांच्या उत्कर्षासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.