यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
शहरातील पंचशील नगरमधील रहिवाशी मिलिंद अंबादास गजरे वय-५५ वर्ष या इसमाचा अंगावर कुलर पडुन विजेच्या धक्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना काल दि.७ जुलै शुक्रवार रोजी घडली असुन पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,येथील शहरातील पंचशील नगरमध्ये राहणारे मिलींद आंबादास गजरे वय ५५ वर्ष हा इसम आपल्या राहत्या घरात कुलर सुरू असतांना बटन बंद करण्याच्या प्रयत्नात असतांना अचानक अंगावर कुलर पडल्याने विद्युत पुरवठा सुरू असल्याने विजेचा धक्का लागल्याने ते बेशुध्द पडले.मिलिंद गजरे यांना तातडीने उपचारासाठी यावलच्या ग्रामिण रूग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना पुढील उपचारासाठी एका खाजगी दवाखान्यात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.याबाबत यावल पोलीस ठाण्यात शालु मिलींद गजरे यांनी खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत.