यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
येथील बाल संस्कार विद्या मंदिर शाळेत ग्रामीण रुग्णालय यावल यांच्यामार्फत इयत्ता पहिली ते इयत्ता सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची दि.७ जुलै शुक्रवार रोजी आरोग्य तपासणी करण्यात आली.
येथील बाल संस्कार विद्या मंदीर शाळेत दि.७ जुलै रोजी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थित आरोग्य तपासणी करण्यात आली.यावेळी किरकोळ आजारी विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आले तसेच सर्व विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता राखण्याबाबत आणी पौष्टिक आहार इत्यादी बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.प्रसंगी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याने पालकवर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.या आरोग्य तपासणी कार्यक्रमास यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित तडवी,डॉ.परविन तडवी,औषध निर्माण अधिकारी विनोद बोदडे,परिचारिका श्रीमती रूपाली बाविस्कर यांनी केले.यात शाळेतील काही विद्यार्थ्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथे तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला.सदर आरोग्य शिबीराच्या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक सुनील माळी यांच्या नियोजनानुसार शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थी आरोग्य तपासणी कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले.