Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
ग्रामपंचायती वगळता महानगरपालिका,नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे’चा आदेश दिला आहे यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
मतदार याद्यांबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने ५ तारखेला अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून १ जुलै रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघनिहाय याद्या सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या निवडणुकांमध्ये वापरल्या जातील असा त्यात उल्लेख करण्यात आला आहे.सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे’चा आदेश दिल्याने निवडणुकांची घोषणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे राज्याचे निवडणूक आयुक्त यू.पी.एस.मदान यांनी स्पष्ट केले आहे.