Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
८ जुलै २३ शनिवार
महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षासंदर्भात मोठी बातमी समोर आली असून निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या घटनेची प्रत विधानसभा अध्यक्षांना पाठवल्यानंतर राहुल नार्वेकर अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेविषयी राहुल नार्वेकरांकडून नोटीस जारी करण्यात आली आहे.दोन्ही पक्षांच्या आमदारांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या ४० आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या १४ आमदारांना ही नोटीस जारी केली आहे. एएनआयने या विषयीचे वृत्त दिले आहे.
सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचे प्रकरण गेले तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांवर सोपवली आहे.आपण शिवसेनेच्या घटनेचा अभ्यास करुन यावर निर्णय घेऊ असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले होते त्यानुसार त्यांनी निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेची मागणी केली होती त्यानुसार निवडणूक आयोगाने ही प्रत त्यांना पाठवली असून राहुल नार्वेकर हे आता अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत असून त्यांनी शिवसेनेला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नोटीस बजावली आहे.शिवसेनच्या घटनेच्या आधारे हा निर्णय घेण्यात येणार आहे.शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून एकमेकांच्या आमदारांच्या पात्रतेवर आक्षेप घेण्यात आला आहे यावेळी आमदारांना पुराव्यांसह प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे.