यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
येथील पोलीस स्टेशनमध्ये कोरोना संसर्गाच्या अत्यंत कठीण काळात उत्कृष्ठ अशी सेवा बजावणारे व सद्या जळगाव येथे मुख्यालयात असलेले दबंग अधिकारी म्हणुन ओळख निर्माण करणारे पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांनी गुरूपौर्णिमेचे औाचीत्य साधत जळगाव ते यावल पर्यंत पायदळ यात्रा करून श्री व्यास महाराजांचे नुकतेच दर्शन घेतले आहे.
संपूर्ण जगाला २०१९ ते २o२० या काळात हादरून टाकणाऱ्या कोरोना या संसर्गजन्य आजाराच्यामुळे अनेकांना आपला जिव गमवावा लागला असुन अशा कठीण काळात यावल पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांनी शासनाने घातलेले निर्बंध जमावबंदीच्या आदेशाची काटेकोर अमलबजावणी करीत अनेकांना धोकादायक अशा कोरोना संसर्गा पासुन वाचविले आहे.पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांनी संसर्गाच्या कठीण समयी केलेल्या कर्तव्याची बजावणी यावलकर कधीही विसरणार नाही.अशा हे कर्तव्यनिष्ठ पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांनी गुरूपौर्णिमेचे औचित्य साधुन यावल या आपल्या कर्तव्यभुमीवर महर्षी व्यास महाराजांच्या दर्शनासाठी रात्री १२ वाजता निघाल्यानंतर जळगाव ते यावल हा ५० किलोमिटरचा प्रवास विदगाव मार्ग यावल असा सहा तास पायदळ करीत यावल गाठले.दरम्यान यावल तालुक्यात त्यांचे कोळन्हावी,डांभुर्णी,किनगाव,गिरडगाव,साकळी,नावरा फाटा,वढोदे व यावल शहरात त्यांचे नागरीकांनी स्वागत केले. यावेळी त्यांनी कोरोनाच्या कार्यकाळात आपल्या स्वतःचा जिव धोक्यात घालुन प्रशासकीय अधिकारी म्हणुन केलेल्या उत्कृष्ठ सेवेच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.तर अरुण धनवडे यांनी यावल येथे आल्यावर प्रसिद्ध महर्षी व्यास महाराजांच्या मंदीरावर जावुन दर्शन घेऊन तालुकावासीयांना सुखी,समृद्ध व आरोग्यदायी जीवन मिळण्याकरिता व्यास महाराजांकडे साकडे घातले.