महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली असून या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते मात्र देवेंद्र फडणवीस आल्यानंतर सुमारे एक तासाने अजित पवार या ठिकाणी आले तसेच बैठक एक तास आधीच संपवून बाहेर पडले.अजित पवार एक तास आधीच बैठकीतून बाहेर का पडले? यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल अशा चर्चा सुरु आहेत अशात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुमारे तीन तास बैठक पार पडली या बैठकीत अजित पवार आले होते पण ते अवघ्या २० ते ३० मिनिटांसाठी आले होते असेही कळत आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रात्री ११.१५ च्या सुमारास वर्षा बंगल्यावर पोहचले होते तर ते २ वाजून १० मिनिटांनी बाहेर पडले उपमुख्यमंत्री अजित पवार हे १२ वाजता बैठकीसाठी पोहचले तर त्यानंतर काही वेळातच ते तिथून बाहेर पडून देवगिरी या त्यांच्या निवासस्थानी गेले.अजित पवार यांच्या अनुपस्थितीत एक तास आधी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली.
अजित पवार यांनी २ जुलैला राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तसेच त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ जणांना शपथ देण्यात आली अशात खातेवाटप आणि विस्तार अद्याप होणे बाकी आहे.राष्ट्रवादीला अर्थ,गृहनिर्माण आणि उर्जा खाती हवी आहेत असे समजत आहे.दुसरीकडे शिंदे गटातलेही अनेक जण मंत्रिमंडळात स्थान मिळावे म्हणून प्रयत्नात आहेत.अशात दुसरा विस्तार कसा असणार? आणि तो कधी होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.