Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
११ जुलै २३ मंगळवार
शिंदे गट हीच मूळ शिवसेना असल्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाला ठाकरे गटाने दिलेल्या आव्हान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ३१ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड व न्या.पी.एस.नरसिंहा यांच्या खंडपीठासमोर युक्तिवाद केला जाईल.केंद्रीय निवडणूक आयोगाने १७ फेब्रुवारी रोजी दिलेल्या निकालामध्ये शिवसेना हे पक्षनाव व धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केले आणि हा गट मूळ शिवसेना असल्याचा निर्वाळा दिला होता.राज्यातील सत्तासंघर्षांचा खटला घटनापीठासमोर सुरू असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाला स्थगिती देण्याची विनंती उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाला केली होती मात्र सरन्यायाधीश चंद्रचूड,न्या.पी.एस.नरसिंहा व न्या.जे.बी.पारडीवाला यांच्या खंडीपाठाने स्थगिती देण्यास नकार दिला होता.सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षनाव व धगधगती मशाल हे निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली होती मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाला ठाकरे गटाने आव्हान दिले असून त्यावर जुलै अखेरीस सुनावणी होईल.
राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी ११ जुलै रोजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर होणार आहे.गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये या नियुक्त्यांना न्या.के.एम.जोसेफ यांनी स्थगिती दिली होती.महाविकास आघाडी सरकारने पाठवलेल्या आमदारांच्या यादीवर तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी निर्णय घेतला नव्हता मात्र शिंदे गट-भाजप सरकारच्या नव्या यादीला मान्यता दिली होती.नव्या यादीला सर्वोच्च न्यायालयातील याचिकेद्वारे विरोध करण्यात आला आहे.