Just another WordPress site

यावल आगारातुन ओंकारेश्वर व त्र्यंबकेश्वरसाठी स्वतंत्र बससेवा सुरु करण्याची डॉ.कुंदन फेगडे यांची मागणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

११ जुलै २३ मंगळवार

येथील बस आगारातुन दर्शनासाठी जाणाऱ्या तालुक्यातील भक्तांसाठी यावल ते ओंकारेश्वर,उज्जैन (मध्यप्रदेश) व त्रंबकेश्वर (महाराष्ट्र ) ही विशेष बस सेवा करावी अशी मागणी आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे यांनी एका निवेदनाव्दारे आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांच्याकडे नुकतीच केली आहे.

डॉ.कुंदन फेगडे यांनी यावल एसटी आगाराचे आगार व्यवस्थापकांना दिलेल्या मागणी निवेदनात म्हटले आहे की,येत्या सोमवारपासुन श्रावण मास सुरुवात होत आहे त्या निमित्ताने यावल ते ओंकारेश्वर (मध्यप्रदेश),उज्जैन (मध्यप्रदेश) त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र) या ठिकाणी यावल तालुका व परिसरातुन भाविक मोठ्या संख्येने या यात्रांना जात असतात त्यामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता महामंडळाच्या प्रयत्नातुन याठिकाणी ये-जा करण्याकरिता बस सुविधा उपलब्ध करून मिळावी असे यावल आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की,एसटी महामंडळाने मागणीनुसार जर बसेस उपलब्ध करून दिल्यास यावल, फैजपूर व रावेर या प्रमुख शहरातील तसेच खेड्यापाड्या तील शेकडो श्रध्दालु भाविकांना याचा लाभ होईल आणी एसटी महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल असे डॉ.कुंदन फेगडे यांनी म्हटले आहे.याबाबत आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी या मागणीला सकारात्मक दुजोरा दिला असुन या मागणी संदर्भात आपण तात्काळ वरिष्ठांशी बोलणी करून भाविकांसाठी बससेवा उपलब्ध करून देण्याकरिता प्रयत्न करू असे सांगीतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.