छगन भुजबळ १० जुलै सोमवार रोजी पुण्यात आले होते.धमकीचा दूरध्वनी आल्यानंतर पुणे पोलिसांकडे तक्रार देण्यात आली होती.पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने तातडीने तपास सुरु केला.भुजबळ यांच्या कार्यालयात धमकीचा दुरध्वनी करणारा तरुण महाड परिसरात असल्याची माहिती तांत्रिक तपासात मिळाली त्यानंतर खंडणी विरोधी पथक महाडला रवाना झाले व सदरील पोलिसांच्या पथकाने प्रशांत पाटील या तरुणाला महाड परिसरातून ताब्यात घेतले आहे.
पोलिसांचे पथक प्रशांत पाटील याला घेऊन पुण्याकडे रवाना झाले असून प्रशांत पाटील याने दारुच्या नशेत छगन भुजबळ यांच्या कार्यालयात संपर्क साधून जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे.गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पुणे पोलिसांच्या वतीने पुढील योग्य ती चाचपणी करून तपास केला जात आहे.