मुंबई,पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
११ जुलै २३ मंगळवार
मुंबई पोलीस दलातील निर्भया पथक व बिट मार्शल अधिक सक्षम बनविण्याकरिता आज दि.११ जुलै २३ मंगळवार रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने निर्भया फंडातून ४० इर्टिगा कार व २०० मोटारसायकलचे मुंबई पोलीस दलात लोकार्पण करण्यात आले आहे.सदरील वाहने मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यातील निर्भया पथकातील तसेच बिट मार्शलच्या गस्तीकरिता वाटप करण्यात आली आहे.या लोकार्पण सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा,अप्पर मुख्य सचिव (गृह) श्रीमती सुजाता सौनिक,बृहन मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर,बृहन मुंबई विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती,मुंबई पोलीस सह आयुक्त (का.व.सु) श्री.सत्यनारायण,पोलीस सह आयुक्त (वाहतूक) प्रवीण पडवळ व मुंबई दक्षिण प्रादेशिक विभाग अप्पर पोलीस आयुक्त अभिनव देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सदरील नवीन वाहने नव्याने मुंबई पोलीस दलात दाखल झाल्याने निर्भया पथक व बिट मार्शल अधिक सक्षम होणार आहे.यादरम्यान मुंबई पोलीस दलातील सर्व वाहनांवर व्हाइकल ट्रेकिंग सिस्टीम (व्हीटीएस) बसविण्यात आलेले आहे.यादरम्यान सर्व वाहनांचे मुख्य व प्रादेशिक नियंत्रण कक्षातून मॉनेटरिंग करण्यात येणार आहे त्यामुळे सर्व वाहने प्रभावीपणे गस्त घालून गुन्ह्यांना प्रतिबंध होऊन नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास मदत होणार आहे असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.