“राष्ट्रवादीला सोबत घेण्याआधी किमान आमच्याबरोबर चर्चा करायला हवी होती” बच्चू कडू यांनी व्यक्त केला संताप
गेल्या आठवड्यात प्रसारमाध्यमांशी बोलत असतांना बच्चू कडू यांना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारल्यावर ते म्हणाले होते की,सहन करण्याची एक मर्यादा असते व ती मर्यादा तुटली की कुणी कुणाचे नसते.माझे असे मत आहे की,मी मंत्री बनण्यासाठी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला नव्हता पण एकंदरीत जी राजकीय व्यवस्था आहे त्या व्यवस्थेत कोण कसे अडचणीत येते हे मी सांगितले होते.भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेत घेतल्यानंतर बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली होती.तीन दिवसांपूर्वी प्रसार माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले होते की,नव्या घडामोडींमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या ४० आमदारांची मोठी गोची झाली आहे.या आमदारांची दोन्ही बाजूने कोंडी झाली आहे.एक वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला कंटाळून आपण भाजपाला पाठिंबा दिला होता.आता अजित पवार हे पुन्हा निधी खेचून घेतील आमच्या निर्णयात आडवे येतील अशी आमदारांना भीती आहे त्याचबरोबर आम्ही सरकारमधील घटक पक्ष आहोत, राष्ट्रवादीला सोबत घेण्याआधी किमान आमच्याबरोबर चर्चा करायला हवी होती पण तसे झाली नाही असे सांगत बच्चू कडू यांनी पुन्हा नाराजी व्यक्त केली आहे.