सप्तश्रृंगी घाटातील बस अपघातातील जखमींना आवश्यक वैद्यकीय उपचार तातडीने व मोफत करण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रशासनाला सूचना
नाशिकमधील वणी येथे सप्तश्रृंगी घाटात ३५ प्रवासी असलेल्या एसटी बसचा भीषण अपघात झाला यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर १८ जण जखमी झाले आहेत.यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपघातातील जखमींना आवश्यक वैद्यकीय उपचार तातडीने व मोफत करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत.आज दि.१२ जुलै बुधवार रोजी सकाळी अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने नाशिक जिल्हाधिकारी आणि कळवणच्या प्रांताधिकाऱ्यांना फोन करुन माहिती घेतली तसेच जखमींना मोफत वैद्यकीय उपचार पुरवण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच पालकमंत्री दादा भूसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनामार्फत मदतकार्य सुरू असल्याचे सांगत अपघातात मृत्यू पावलेल्या महिला प्रवाशाच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त केली असून जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
राज्य परिवहन महामंडळाची बुलढाणा येथील खामगाव आगाराची बस मंगळवारी सप्तश्रृंगी गडावर रात्री उशिराने आली.आज दि.१२ जुलै बुधवार रोजी सकाळी परतीच्या प्रवासाला लागली असतांना घाट मार्गावरील गणपती वळणावर चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने बस दरीत कोसळली.यावेळी बसमध्ये साधारणत: ३२ प्रवासी होते त्यातील १८ जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून स्थानिकांच्या मदतीने अद्याप मदत कार्य सुरू असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले यांनी दिली आहे.सप्तश्रृंगी घाटात एसटी बस अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांचा आकडा १८ वर पोहचला असून त्यांना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्याची सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी यंत्रणेला दिल्या आहेत.