“आपल्या घासातील घास खाणारी राष्ट्रवादी इथे आला त्यामुळे आपली संधी जाते की काय अशी नाराजी असणारच !!” बच्चू कडू यांची स्पष्टोक्ती
शिवसेनेतील शिंदे गटाने मविआ सरकारमधील अर्थमंत्री अजित पवारांवर गंभीर आरोप करत बंडखोरी केली मात्र आता त्यांना पुन्हा ज्यांच्यावर आरोप केले त्याच अजित पवार यांच्याबरोबर सत्तेचे वाटप करावे लागत असून अशातच अजित पवारांना अर्थमंत्रीपद मिळण्याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.यावर बोलतांना शिंदे गट समर्थक अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अजित पवारांना मिळणारे मंत्रीपद आणि आमदारांची नाराजी यावर प्रतिक्रिया दिली आहे.बच्चू कडू म्हणाले की,खातेवाटपामध्ये काही गोष्टींमध्ये किंतू परंतू असू शकतो व प्रत्येकाला वाटते की अजित पवारांकडे अर्थखाते जायला नको कारण मागच्यावेळी अजित पवारांनी जो कारनामा केला तर तो यावेळी होऊ नये अशी अपेक्षा आहे व तसे पुन्हा यावेळी होईल की काय अशी आमदारांना भीती आहे असे बच्चू कडू नमूद केले आहे.
प्रत्येक आमदाराला असे वाटते आणि त्यातील चार-पाच आमदार मलाही म्हणाले की,अजित पवारांकडे पुन्हा अर्थ खाते गेले तर ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना जास्त निधी देणे,इतरांना कमी देणे हाच प्रकार करतील म्हणून सर्वांना वाटते की अर्थखाते अजित पवारांना देऊ नये असा दावा बच्चू कडूंनी केला आहे.आमदारांची नाराजी दूर करणे हे सरकारपुढे मोठे आव्हान आहे कारण तिसरा पक्ष सरकारमध्ये आल्याने त्यांच्या वाट्याला काही मंत्रीपदे गेली आहेत त्यामुळे आधीच अपेक्षा असलेल्यांना वाटते की आपल्या घासातील घास खाणारी राष्ट्रवादी इथे आला त्यामुळे आपली संधी जाते की काय अशी नाराजी असणारच आहे असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.