Just another WordPress site

“उद्या संध्याकाळपर्यंत खातेवाटप आणि मंत्रीमंडळ विस्ताराबाबत निर्णय” सुनील तटकरे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१२ जुलै २३ बुधवार

अजित पवार बंडखोरी करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले असले तरी त्यांच्यासह बंडखोर गटाचे ९ मंत्री अद्यापही विनाखात्याचे मंत्री आहेत त्यामुळे खातेवाटप व मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत अशातच अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी पत्रकारांनी विचारले असता त्यांनी तारीखच जाहीर केली आहे.सुनील तटकरे म्हणाले की,राज्याचे मंत्रीमंडळ स्थापन झाल्यापासून अजित पवार दिल्लीला गेलेले नाहीत व हा काही तिढा नाही तसेच रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आम्ही कधीही आग्रही नव्हतो ज्यावेळी एकत्रितपणे काम करायचे ठरलेले असते त्यावेळी त्याबाबतची जाणीव मनात ठेऊन काम करणे गरजेचे असते असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.

सुनील तटकरे म्हणाले की,याबाबतचा योग्य तो निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या स्तरावर घेतील आणि आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर एकजुटीने काम करण्यासाठी बरोबर आहोत.उद्या संध्याकाळपर्यंत खातेवाटप आणि मंत्रीमंडळ विस्ताराबाबत निर्णय झालेला तुमच्यासमोर येईल असेही सुनील तटकरे यांनी नमूद केले आहे.

दरम्यान बच्चू कडू खातेवाटपावर म्हणाले होते खातेवाटपामध्ये काही गोष्टींमध्ये किंतू परंतू असू शकतो प्रत्येकाला वाटते की अजित पवारांकडे अर्थखाते जायला नको.मागच्यावेळी अजित पवारांनी जो कारनामा केला तर ते यावेळी होऊ नये अशी अपेक्षा आहे व तसे पुन्हा यावेळी होईल की काय अशी आमदारांना भीती आहे.प्रत्येक आमदाराला असे वाटते आणि त्यातील चार-पाच आमदार मलाही म्हणाले की अजित पवारांकडे पुन्हा अर्थ खाते गेले तर ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना जास्त निधी देणे,इतरांना कमी देणे हाच प्रकार करतील म्हणून सर्वांना वाटते  की अर्थखाते अजित पवारांना देऊ नये तसेच आमदारांची नाराजी दूर करणे हे सरकारपुढे मोठे आव्हान आहे कारण तिसरा पक्ष सरकारमध्ये आल्याने त्यांच्या वाट्याला काही मंत्रीपदे गेली आहेत त्यामुळे आधीच अपेक्षा असलेल्यांना वाटते की आपल्या घासातील घास खाणारी राष्ट्रवादी इथे आला त्यामुळे आपली संधी जाते की काय अशी नाराजी असणारच आहे असेही बच्चू कडू यांनी नमुद केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.