Just another WordPress site

“बच्चू कडू आज ११ वाजता आपली पुढील वाटचालीसंदर्भातली भूमिका जाहीर करणार!!”

अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१३ जुलै २३ गुरुवार

एकीकडे राज्यात मंत्रीमंडळ विस्तार व खातेवाटपाची जोरदार चर्चा पाहायला मिळत असून सत्ताधार गटांमधील काही संभाव्य आमदारांना मुंबईतच राहण्यासही सांगण्यात आल्याचे बोलले जात आहे.या पार्श्वभूमीवर मंत्रीपदासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून इच्छुक असणारे बच्चू कडू मात्र अद्याप त्यांच्या मतदारसंघातच आहेत.यासंदर्भात त्यांनी टीव्ही ९ ला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये मोठे विधान केले असून आपण आज ११ वाजता आपली पुढील वाटचालीसंदर्भातली भूमिका जाहीर करणार आहोत असे ते म्हणाले आहेत त्यामुळे मंत्रीपदामुळे नाराज असणारे बच्चू कडू आता नेमकी काय भूमिका घेणार? यावर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.दरम्यान मंत्रीपदी वर्णी लागणाऱ्या संभाव्य आमदारांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे फोन संबंधित आमदारांना गेल्याची चर्चा आहे या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी फोन आल्याची माहिती दिली आहे.मंत्रीमंडळ विस्ताराबाबत मला फोन आलेला असला तरी आज ११ वाजता मंत्रीमंडळात सामील होणार किंवा नाही होणार वगैरे याबाबत माझी भूमिका मी जाहीर करणार आहे असे बच्चू कडू म्हणाले.त्यांनी मला फक्त फोन करून बोलवले असून विस्ताराबाबत काय निर्णय घ्यायचा याबाबत आज ११ वाजता मी भूमिका जाहीर करणार आहे असेही बच्चू कडू यांनी नमूद केले आहे.

मंत्रीमंडळ विस्तार का रखडला हे मला माहिती नाही ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसच सांगू शकतील परंतु आता इथून पुढे कशासाठी राजकारण करायचे? कुणासाठी काम केले पाहिजे? पुढील वाटचाल कशी केली पाहिजे? यासंदर्भात मी बोलेन हा निर्णय नेमका कुणाला धक्का देणारा असेल इतरांना धक्का देणारा असेल की मलाच धक्का देणारा असेल ते तेव्हा कळेल असे बच्चू कडू म्हणाले.दरम्यान इतर संभाव्य आमदारांप्रमाणेच गेल्या काही दिवसांपासून आपल्या विधानांमुळे चर्चेत असणाऱ्या भरत गोगावलेंनाही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा फोन गेला असेल असे बच्चू कडू म्हणाले आहेत त्यामुळे नेमके मंत्रीमंडळात कुणाला सहभागी करून घेतले जाणार? याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.