Just another WordPress site

भरत गोगावले यांच्या “महिला आणि पुरुष थोडा फरक येतो ना?” वक्तव्याचा रुपाली चाकणकर यांच्याकडून निषेध

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१३ जुलै २३ गुरुवार

अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर महायुतीत मंत्रीपद आणि पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू असून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आदिती तटकरे आणि शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले या दोन नेत्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.सदरील चर्चा सुरू असतांना भरत गोगावले यांनी वादग्रस्त विधान केले असल्यामुळे महायुतीतील पक्षांमध्ये नवीन वादाला तोंड फुटले आहे.मी आदिती तटकरेंपेक्षा चांगले काम करू शकतो.महिला आणि पुरुष यांच्यात थोडा तरी फरक येतोच ना असे विधान भरत गोगावले यांनी केले आहे या विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भरत गोगावलेंवर टीका करायला सुरुवात केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनीही गोगावले यांच्यावर टीकास्र सोडले असून भरत गोगावले आपल्या वक्तव्यामधून आपल्या पुरुषी मानसिकतेचे दर्शन सबंध महाराष्ट्राला होत आहे अशी टीका चाकणकर यांनी केली आहे.

रुपाली चाकणकर ट्वीटमध्ये म्हणाल्या की,आज एकेठिकाणी बोलतांना शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी आम्ही त्यांच्यापेक्षा म्हणजे आदिती तटकरे यांच्यापेक्षा चांगले काम करू महिला आणि पुरुष थोडा फरक येतो ना? असे वक्तव्य केल्याचे निदर्शनास आले.राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहिले.पण महाराष्ट्रातील कोणतीही महिला मग ती मंत्रीपदावर विराजमान असलेली असो किंवा ती सामान्य गृहिणी असो ती आज कोणत्याही पुरुषापेक्षा कमी नाही.आपल्या या वक्तव्यामधून आपल्या पुरुषी मानसिकतेचे दर्शन सबंध महाराष्ट्राला होत आहे. भरत गोगावले आपण त्या जिल्ह्यातून येता जिथे संपूर्ण महाराष्ट्र नतमस्तक होतो जिथे विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राजधानीची स्थापना केली ज्या रायगडच्या आपल्या राजाने महिलांच्या सन्मानाला जीवापाड जपले आपण त्या रायगडमधून येता जिथे छत्रपती संभाजी महाराजांनी आपली पत्नी येसूबाई यांना ‘सखी राज्ञी जयती’ असा सन्मान करून त्यांच्या अनुपस्थित राज्यकारभार चालवण्याचा हक्क दिला त्यामुळे महिलांच्या सन्मानाची जाणीव सर्वात जास्त तर आपल्याला असायला हवी आपण केलेल्या वक्तव्याचा मी तीव्र निषेध व्यक्त करते अशा शब्दात रुपाली चाकणकर यांनी निषेध व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.