“मुख्यमंत्र्यानी विनंती केल्यामुळे आजचा दावा सोडण्याचा निर्णय १८ तारखेपर्यंत पुढे ढकलत आहे” बच्चू कडू यांची पत्रकार परिषदेत माहिती
अपक्ष आमदार बच्चू कडू गेल्या काही दिवसांपासून मंत्रीपदामुळे नाराज असल्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत होती यासंदर्भात खुद्द बच्चू कडू यांनीही अनेकदा सूचक विधाने करून चर्चेची राळ उडवून दिली होती.आज सकाळीही त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपण ११ वाजता निर्णय जाहीर करणार असे म्हटले होते अखेर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका सविस्तर मांडली आहे यावेळी गेल्या अर्ध्या तासात मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वारंवार फोन आल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी बोलताना बच्चू कडूंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करताना घडलेल्या घडामोडी सांगितल्या.मागच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरेंकडे आम्ही दोन आमदार गेलो त्यांनी आमच्याकडे स्वत: फोन करून पाठिंबा मागितला त्यावेळी आम्ही पाठिंबा दिला त्यानंतर बऱ्याचदा इतर पक्षांकडून आम्हाला आमिष आली पण आम्ही आमच्या पाठिंब्यावर ठाम राहिलो तसेच उद्धव ठाकरेही दिलेल्या शब्दावर ठाम राहिले आणि मी राज्यमंत्री झालो असे ते म्हणाले.परंतु त्यानंतर राज्यात नवीन सत्तासमीकरण जुळायला लागली.आम्ही उद्धव ठाकरेंना दिव्यांग मंत्रालयासाठी भेटत होतो तेव्हा दिव्यांग मंत्रालय झाले असते तर गुवाहाटीला जायची वेळ आली नसती.पण एकनाथ शिंदेंनी दिव्यांग मंत्रालय तयार केले.माझ्यासाठी ही आयुष्यातली सर्वात मोठी घटना आहे.मी गुवाहाटीला जाण्यामुळे या देशातले पहिले दिव्यांग मंत्रालय अस्तित्वात आले त्यासाठी मी वैयक्तिक पातळीवर आयुष्यभर एकनाथ शिंदेंचे आभार मानत राहीन असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले.
दरम्यान यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवरील आपली नाराजी बोलून दाखवली.एकंदरीत सत्ता,पैसा आणि पुन्हा सत्ता या बदलत्या राजकारणाचा आम्हाला कंटाळा आला आहे.सगळे काही पदासाठी नसते काही लोक म्हणतात की तुम्हाला आता पद मिळणार नाही वगैरे मी त्याची पर्वा करत नाही आमची भूमिका ठाम आहे.आम्ही इथून पुढे दिव्यांगांसाठी,शहीद परिवारांसाठी काम करणार आहे अशी भूमिका बच्चू कडूंनी यावेळी मांडली.मी आज मंत्रीपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार होतो पण गेल्या मुख्यमंत्री अर्ध्या तासापासून खूप फोन करत आहेत त्यांनी मला त्यांची भेट घेतल्यानंतर निर्णय घेण्यासंदर्भात विनंती केली आहे त्यामुळे मी त्यांची विनंती म्हणून आजचा दावा सोडण्याचा निर्णय १८ तारखेपर्यंत पुढे ढकलला आहे त्यांनी १७ तारखेला भेटण्यासाठी विनंती केली आहे.त्यानंतर १८ तारखेला तुम्हाला हवा तो निर्णय घ्या असे ते म्हणाले आहेत त्यानुसार मी १८ तारखेला माझा निर्णय जाहीर करेन असे बच्चू कडू यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.आपण सामान्यांसाठी आहोत,सामान्यांसाठी राहायला पाहिजे.काही चुका आमच्या हातून झाल्या असतील पण त्या दुरुस्त करण्याची काळजी आम्ही करायला पाहिजे.मला दिव्यांगांसाठी,मतदारसंघासाठी वेळ द्यायचा आहे त्यामुळे मंत्रीपद घेतले तर तो वेळ देता येणार नाही.मी आज निर्णय घेणार होतो पण मुख्यमंत्र्यांनी मला विनंती केली की आज कुठला निर्णय घेऊ नका पण मी माझ्या निर्णयावर ठाम राहीन.१८ तारखेला मी त्यासंदर्भात निर्णय जाहीर करेन असे ते म्हणाले.बच्चू कडू वैयक्तिक फायद्यासाठी कधीच नाराज होणार नाही.आम्ही सामान्य माणसासाठी लढू,मरू.स्वत:साठी नाराज होण आमच्या मायबापाने कधी शिकवले नाही.आमच्या थोरांनी कधी शिकवले नाही.उद्या दोन पावल मागे घेऊन पद घेणे आमच्यासाठी महत्त्वाचे नाही त्यामुळे या सरकारमध्ये आता अशा पद्धतीने जायचे नाही असे माझ्या डोक्यात मी ठाम ठरवले आहे त्यामुळे सामान्य लोकांसाठी काम करावे असे मला वाटते अशा शब्दांत बच्चू कडूंनी आपली भूमिका स्पष्टपणे समोर मांडली आहे.