यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१३ जुलै २३ गुरुवार
विशेष मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहिम ही दि.७ ऑगस्टपासून सुरू होत असून यासंदर्भात यावल पंचायत समितीमध्ये आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक सहाय्यिका,आरोग्य सेविका,गट प्रवर्तक,आशा वर्कर आणी सर्व प्राथमीक आरोग्य केंद्र तथा नगर परिषद आरोग्य विभाग यांची मार्गदर्शन बैठक यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजु तडवी यांच्या प्रमुख उपास्थित आज दि.१३ जुलै गुरुवार रोजी पार पडली.
यावल तालुक्यात शासनाच्या आरोग्य विभागाच्या सुचनेवरून गरोदर मातांसाठी दि.७ ऑगस्ट २३ पासुन विशेष इंद्रधनुष्य मोहीम संपुर्ण तालुक्यात राबविण्यात येणार असुन यासंदर्भात सुचना आणि मार्गदर्शन करण्याबाबतची बैठक आज दि.१३ जुलै गुरुवार रोजी यावल पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली.यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजु तडवी यांनी सविस्तर माहीती देतांना सांगीतले की,सदरची आरोग्य मोहीम तीन राऊंड मध्ये (फेरी) असतील.यात पहिली फेरी ७ ते १२ ऑगस्ट,दुसरी फेरी ११ ते १६ सप्टेंबर व तिसरी फेरी ९ ते १४ ऑक्टोबर अशा राहणार आहेत.तरी आपल्या कार्यक्षेत्रातील ० ते ५ वर्षाआतील व गरोदरमाता यांचे आशावर्करकडून घरभेटीद्वारे गाव, पाडा, वस्ती,झोपडपट्टी,शेतशिवार,बांधकाम,सूतगिरणी इ.ठिकाणी व्यवस्थितपणे सर्वेक्षण करण्यात यावे व सर्व लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून लसीकरण झालेले आहे किंवा सुटलेले अथवा राहिलेले लाभार्थी असतील तर वयानुसार देय असलेली लस आपल्या दरमहा नियमित लसीकरण सत्राच्या ठिकाणी त्याचे लसीकरण करण्यात यावे व डीयूए लिस्ट अपेक्षित यादी तयार करून मायक्रोप्लॅन तयार करण्यात यावे व एकही लाभार्थी लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सुचना तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजु तडवी यांनी दिल्या आहेत.